अंतरी माझ्या जरी आकांत आहे चेहरा माझा तरी हि शांत आहे अक्षरांचा खेळ नाही कविता ह…

अंतरी माझ्या जरी आकांत आहे
चेहरा माझा तरी हि शांत आहे
अक्षरांचा खेळ नाही
कविता हि माझी
जीवनाचा खरा वृतांत आहे
अलविदा ….
अलविदा …. !!
खुलासे अधुरेच राहतात
आणि …..
निघायची वेळ होते
अलविदा म्हणण्यास मी वळणार
नाही ..
दुख शब्दांनी असे टळणार नाही
अलविदा म्हणण्यास मी वळणार
नाही..
हरणे माझ्या जरी नशिबात आहे
मी रणांगण सोडूनी पळणार नाही
अलविदा म्हणण्यास मी वळणार
नाही..
वेदनांचा नाद आहे
कविता हि माझी
ती सुखांना भाळूनी जळणार नाही
अलविदा म्हणण्यास मी वळणार
नाही ..
ये चितेवर चुंबने ठेउनी जा तू
प्रेत हे माझे तसे जळणार नाही
अलविदा म्हणण्यास मी वळणार
नाही
दु:ख शब्दांनी असे टळणार नाही ..
अलविदा …

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *