आजचे शाहानपन

आजचे शाहानपन……….

“दोन वाईट गोष्टींमधून एक निवडायची वेळ आल्यास अशी गोष्ट निवडा जी तुम्ही पूर्वी करून पाहिली नाही.”

“ग्लास अर्धा भरलेला आहे की अर्धा रिकामा आहे
याचा विचार करण्यात वेळ न घालवता,
ग्लास रिकामा झाल्यावर धुणार कोण याचा विचार करावा.”

लहानपणी खेळांविषयी प्रेम असतं
तर……….
तारुण्यात प्रेमाचे खेळ सुरू होतात…
———————————————————————
आपली वडीलधारी मंडळी किती चलाख आहेत
आम्हाला ते शिकवतात की ,
‘ प्रत्येक स्त्रीला मातेसमान माना ‘
ठिक आहे
यामुळे आपली नीतीमत्ता सुधारेल
पण
आपल्या वडीलांची बिघडेल त्याचं काय ?

– आचार्य अत्रे
———————————————————————
हल्लीच्या माणसांनी किती ताळतंत्र सोडलायं, काही कल्पना आहे का?…
… अहो, आपल्या स्वयंसिद्ध बापुंचं प्रवचन सुरु असताना भक्तगणांमधला एकजण चक्क आरामात सिगरेट ओढत होता… हे दृश्य पाहुन मला एवढा धक्का बसला की हातातला बिअरचा कॅन निसटून खाली पडला!!!
———————————————————————
यशाच्या मार्गावर नेहमीच ‘अंडर कन्स्ट्रक्शन’ची पाटी लटकत असते…….

———————————————————————

* ‘ सदैव’ आणि ‘कधीच नाही’
हे शब्द कधीच वापरू नयेत हे सदैव लक्षात ठेवा.

———————————————————————

* पहिले चाक ज्याने शोधून काढले, त्याचे एवढे कौतुक कशाला? इतर तीन ज्यांनी शोधली, ते खरे कौतुकाला पात्र आहेत!!!!

———————————————————————

* माणसांचीही गंमत असते पाहा. तुम्ही एखाद्या माणसाला सांगा, आकाशगंगेत ३०० अब्ज तारे आहेत… तो चटकन विश्वास ठेवतो. पण, पार्कातल्या बेंचला नुकताच रंग लावलाय, तो ओला आहे असं सांगा… तो स्वत: हात लावून बोटं बरबटवून खात्री करून घेतल्याशिवाय राहात नाही!!!!

———————————————————————
का? का? का?

१. पोहणे हा जगातला सर्वात बेस्ट व्यायाम असेल, तर देवमासे इतके जाडे ढोले का असतात?
२. स्टेडियममध्ये जिथे प्रेक्षक ‘बसतात’ त्या जागेला ‘स्टँड’ का म्हणतात?
३. जगात सर्वांना स्वर्गात जायचं असतं, पण मरायचं कुणालाच नसतं, असं का?
४. बुद्धिबळाच्या पटावरही वर्णभेद असतो का? नसेल, तर मग पांढऱ्या सोंगट्यांना पहिली चाल का

99 वर्षांची म्हातारी जेव्हा ‘हच का नया लाइफटाइम रिचार्ज’ घेते!
———————————————————————
आपली चूक असताना जो माफी मागतो, तो प्रामाणिक असतो.
आपली चूक आहे की नाही, याची खात्री नसतानाही जो माफी मागतो, तो शहाणा असतो.
आपली चूक नसतानाही जो माफी मागतो, तो नवरा असतो!!!
———————————————————————
जुनी मोटर कार खरेदी करावयाची असल्यास , तिची योग्य किंमत ठरविण्याची पद्धत
जी कार आवडेल ती दोन तास ट्रायलसाठी मागून घ्यावी व अशाच दुसर्‍या जुन्या गाड्यांच्या डिलरकडे घेऊन जावी. त्याला सांगावं की , तुम्हाला ही गाडी विकायची आहे. किती किंमत येईल ?
तो सांगेल ती किंमत गाडीची खरी किंमत !
———————————————————————
तुम्ही बरोबर असता तेव्हा कोणी तुम्हाला लक्षात ठेवत नाही,
तुम्ही चुकता तेव्हा कोणी तुम्हाला विसरत नाही …

———————————————————————

प्रोफेसर विसराळू का असतात याचं कारण एका प्रोफेसरांनीच शोधून काढलं. परंतु नंतर ते कारण प्रोफेसर विसरून गेले.

———————————————————————

हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!

———————————————————————

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते, असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का?
जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

———————————————————————

नकार देणे ही कला असेल. पण, होकार देऊन काहीच न करणे, ही त्याहून मोठी कला आहे.
———————————————————————
मार्क ट्वेन हा अतिशय बुद्धिमान आणि खोचक विनोद करणारा लेखक होऊन गेला.
त्याची काही निरिक्षणे जगप्रसिद्ध आहेत.
त्याचा हा सर्वांगसुंदर विनोद
“जेंव्हा एक तरुणी एका तरुणाच्या हृदयावर डोके ठेवते ;
तेव्हा मला फ़ार गंमत

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *