आम्ही पुणेकर….

“……..आम्ही पुणेकर………”

आम्ही पुणेकर किनई ,
सोडत नाही बोलायचा chance….
वाटल्यास आम्ही बोलतो,
जे वाटेल ते in advance…..

खदाड खाऊ आम्ही,
पाणीपुरी वा pizza, फडशा पडतो….
बाकी खायच्या बाबतीत आम्ही,
सर्वांना minitaत मागे सारतो….

system विरुद्ध आम्ही,
तसे भर भरून बोलतो…
आणि वेळ येताच शेपूट,
आत घालून देखील पळतो…

अगदीच असे नाही हो,

कधी कधी आमच्यात
शिवाजी महाराजही संचरतो….
भले जयंती दोनदा साजरी करो….
पण साजरी तर करतो…..

आम्ही traffic rules
धाब्यावर देखील बसवतो…..
आणि वर मान करून,
मामाला ‘मामा’ बनवतो…..

galsच्या बाबतीतही आम्ही
अजिबात backward नाही….
ये नही और सही….
इथे कोणाला आहे घाई???

शनिवार वड्या बद्दल
आम्हाला खूप अभिमान आहे…
भले तिकडे फिरकत नसू,
पण कोणाची बोलायची टाप आहे?

तसे आमचे नेहमी असते,
बेफिकीर नि धम्माल जिणे…
कारण, पुणेकरच आम्ही,
इथे नसते कशाचेच उणे….

त्याचे काय आहे….

उणं कशातच असू नये,
आजवर हेच आलोय शिकत….
उगाच नाही पुण्याला,
शिक्षणाचे ‘माहेरघर’ म्हणत….

(आम्ही पुणेकरच हो……….)

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *