तीट

जोजवते एक स्वप्न, हातांच्या पाळण्यात.. चंद्र तारे टांगले वर, बघ बाळा खेळण्यास…! . पाळण्याला पतंग डोर, गाते अंगाई हिंदोळ्यात.. उंच उंच आकाशभर, भरारूदे पाखरास…! . स्मित रेखले स्वप्न, निरं घोर दुलईत.. जागत्या डोळ्यांची जर, तीट गोऱ्या स्वप्नास…!

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *