मैत्रीचे दिवस

मैत्रीचे दिवस इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात..
भुरकन उडून जातात..
नंतर उरतात ती आठवणीची पिसे..
काही मऊ,काही खरखरीत..
काही काळी,काही पांढरी..
जमा होतील तेवढी पिसे आपण गोळा करायची..
त्यांना गूंफवून बनवायची आठवणीची चटई..
आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी…

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *