वर्‍हाडी ठसका क्र.(१)

माह्या कॉलेजमंदी दोस्ता………….
एक पोरगी आली
तिच्या एक स्माईलवर
सारी पोरं फिदा झाली ||धृ||
तिचं तोंड पायण्यासाठी
सगळी तोंडं धुवून आली
हळूच पायलं तिनं मले
वाटलं,आपली लाईन clear झाली ||१||
मंग मीही रोज सकाळ दुपार संध्याकाळ
तिच्या मागं धाऊ लागलो
हळूच “Good Morning” म्हणून
सारे पैसे सारू लागलो ||२||
एक दिवस मोका पाहून
जवा मनातली गोष्ट केली
हळूच पायातली सँड़ल
तिच्या हातामंदी आली ||३||
माह्या ध्यानात आलं तेव्हा
मोठा उदघाटन होणार हाय
हळूच रस्ता काटू लागलो
घेतलं कायमचं Good Bye ||४||

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *