” वेळच नाही !! “

द्या त्यांना पाकीट किंवा विकतचे जे पसंत आहे,
वाटे, बनवू काही साजेसे पण कुणा येथे उसंत आहे!

घरी जेवायचे आमंत्रण, पण उडप्या कडे संध्याकाळ,
घरीच खाऊ चार घास, तर पिझ्झा आहेच तात्काळ!

व्याप असे हा जीवास केवळ, क्षण मोलाचे आठवणे,
वेळ नाही भेटण्या-बोलण्या, पोस्टाने भेटी पाठवणे!

पैसा आसतो वेळ नसतो, भावनेची किंमत उरत नाही,
विकत आणून देता येते पण काळजात खोल मुरत नाही!

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *