व्हॅलंटाइन डे स्पेशल… मराठीतून “ईश्श” म्हणून प्रेम करता येत, उर्दूमध्ये “ईष्क…

व्हॅलंटाइन डे स्पेशल…

मराठीतून “ईश्श” म्हणून प्रेम करता येत,
उर्दूमध्ये “ईष्क” म्हणून प्रेम करता येत,
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येत,
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी, प्रेम करता येत!
“लव्ह” हे त्याचेच दुसर नेम असत,
कारण…..
प्रेम म्हणजे…. प्रेम म्हणजे… “प्रेम” असत! तुमच आमच अगदी “सेम” असत……

व्हॅलंटाइन डे एकापरीने हा दिवस म्हणजे “त्याला” किंवा “तिला” कापण्याचा दिवस होउ लागला आहे.

मग या दिवशी “युवर लव्ह पुट अ साँग ईन माय हार्ट – ईट गोज स्वीटर अज माय लव्ह फॉर यू गोज डीपर” अशा अनेक काव्यपंक्तीनी सुशोभित केलेली दहा रुपयांपासुन ते दोनशे रुपयांपर्यंत मिळणारी खास ग्रिटींग्ज. सुमारे २५ रुपयांपासुन ३०० रुपयांपर्यंतच्या किमतीचे बदामाच्या आकाराचे चॉकलेट बॉक्सेस, प्रेमविषयक पुस्तके, स्ट्फ्ड टॉईज अर्थात – “ओ डियर, बी माईन!” लिहिलेले गुबगुबीत टेडी बेअर्स. गुलाबाची फुल आणि ३०० ते १००० रुपए किमतीचे गुलाब आणि लिलीच्या फुलांनी सजवलेले लव्ह अण्ड डिव्होशन पुष्पगुच्छ, या सगळ्या गोष्टि ह्या दिवसाची वेशिष्ट्ये ठरतात.

पण गरज असते का?

तिचा अश्वासक हात हातात असतो तेव्हा जग जिंकल्याची भावना त्याच्या मनात असते आणि त्यान समजून घेत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला जवळ घेतल की प्रेमाखातर सगळ्या जगाशी लढण्याच बळ तिच्यात संचारत.

स्पर्शातली खरी जादू प्रेमात पडलेल्यांना माहीत असते. बाकीच्यांसाठी असतात अनेक निरर्थक स्पर्श जे कळत नकळत होत असतात. पण प्रेमात पडलेल्यांसाठी स्पर्श असतो एक भाषा… एक संवाद… एक अश्वासन… एक आनंद… आणि एक समाधान.

व्हलेन्टाईन्स डे हा केवळ प्रेमिकांचा दिवस न राहता निखळ मेत्री व्यक्त करण्याचा दिवस व्हावा अस अनेकांच मत आहे. तर बरेच जण ह्या दिवसातील तोचतोचपणा टाळून जरा वेगळ्या पध्दतीन हा दिवस साजरा करतात. नुसतच “लव्ह यू” म्हणून प्रेम व्यक्त करण्यापेक्षा स्वत:ची प्रतिभा ज्यातून दिसून येईल अस एखाद प्रेमपत्र किंवा प्रेमकविता लिहूनही हा दिवस साजरा करता येतो.

तुम्हाला काय वाटत?

पण कुणीही काहीही म्हणाल तरी हा गुलाबी दिवस साजरा होणारच! तेव्हा या दिवसाच्या सदुपयोगासाठी अन मनातील प्रीतीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वांना मनापासुन प्रेमपूर्वक शुभेच्छा! कारण…..

प्रेम म्हण्जे…. प्रेम म्हणजे… प्रेम असत, तुमच आणि आमच अगदी “सेम” असत.

तुम्हाला काय वाटत? व्हॅलंटाइन डे कसा साजरा करावा?

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *