आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन सैरभैर होते, काहीच कळत नाही त्याला असे का त्या…

आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन सैरभैर होते, काहीच कळत नाही त्याला असे का त्याला होते. आठवण को

आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन सैरभैर होते,
काहीच कळत नाही त्याला असे का त्याला होते.

आठवण कोणाची जेव्हा येते मन त्याच्या आठवणीत गुरफटून जाते,
आणखीन मग त्याच जाळ्यातून कधी निघता येतच नाही.

आठवण कोणाची जेव्हा येते मन पाखरू बनून भुरकन उडून जाते,
आणखीन वेडी पीसी होऊन त्यालाच सगळीकडे शोधू लागते.

आठवण कोणाची जेव्हा येते सगळा राग रंग बदलून जातो,
ओसाड वाळवंटात ही मग फुलोरा उमलून जातो.

अशी ही आठवण कोणाची जेव्हा येते तेव्हा मन आठवणींच्या दुनियेत रंगून जाते

रागवता येत का रे तुला मला तरी नाही आठवत बाबा रागवता येत का रे तुला मग तो राग कध…

रागवता येत का रे तुला मला तरी नाही आठवत बाबा रागवता येत का रे तुला मग तो राग कधी दिसला का नाही मला …

रागवता येत का रे तुला
मला तरी नाही आठवत बाबा

रागवता येत का रे तुला
मग तो राग कधी दिसला का नाही मला

म्हणतोस कि तू रुसतोस
मग नजरेला नजर भिडताच का हसतोस

मला माहित आहे तुला नाही जमायचं
रागवून माझ्यावर नाही बोलायचं

रागवला जरी तरी भांडतच असतोस
जेणेकरून माझ्याशीच बोलतोस

पण तुझ्या रागावर उपाय माहित आहे मला
माझ्या गालावरील स्मित हास्याचा कळा

आज मी हसून हसून किती दमले
बोलशील काहीतरी म्हणून थांबले

आज असा कसा रुसलास बर
माझ हास्य जाऊ दे पण तुझ्या आईचे अश्रू बघतर खर

वाद तरी घाल माझ्याशी आज
आज तुला आलाय तरी कसला माज

तुझ्याच आईने सावरलय मला
तू नाहीस आत्ता असं सांगतेय मला

तुला मला हसताना पाहायचे आहे
तर तुला परत येण हि भाग आहे

आत्ता या गालांवर कधी नाही येणार ते हास्य
कारण मला नाही कळलं अजून तुझ्या जाण्याचं रहस्य

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत| कधी राग तर…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत, माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत| कधी राग तर कधी गालावरच मिश्

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ जरा जास्त तुझा कधी कमीच असत|
कधी राग तर कधी गालावरच मिश्खिल हास्य असत,
कधी भांडण तर कधी frustration असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत..

आज सुखद चंद्राची शीतल छाया असत,
तर कधी पाण्याविणा तापलेली धरणी असत |
कधी हळूवार झूलणारा झोका तर,
कधी राजधानी एक्सप्रेस च्या ट्रॅक वरचा engine असत |
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत …

आज प्रेमाच्या आणा भाका घालता श्वास कमी पडतो,
तर उद्या रुस्व्या फुगव्याला कारण नसत|
आज काहीही केलेला अमृतमय वाटत,
तर उद्या साधा बोलन पण विशपरी दुखद असत|
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत,
माझ कधी जास्त पण तुझा ही तेवढच जिवापाड असत|

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव…………. प्रेमासाठि जगाव……….. प्रेमाखातर मराव………………

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव…………. प्रेमासाठि जगाव……….. प्रेमाखातर मराव……………. त्याच्या एक

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव………….
प्रेमासाठि जगाव………..
प्रेमाखातर मराव…………….

त्याच्या एका हास्यावरती
अवघं विश्व हरावं
अन अश्रुच्या थेंबालाहि
डोळ्यात स्वत:च्या घ्यावं….

दुखाची भागी होऊन ….
सुख त्याच्यावर उधळाव………………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

तु आणि मी हे व्याकरण
प्रेमात कधीच नसावं………….
आपलेपणाच्या भावनेतच
सार मी पण सराव…..

एकमेकांच होऊन
एकमेकांना जपाव………
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

मधुर त्याच्या आठवणीमध्ये
रात्र – रात्र जागावं……….
अन चुकून मिटताच पापण्या
स्वप्नात तयाने यावं..

बहरल्या रात्रीत चांदण्या
त्याच्या विरहात झुराव…….
पण खरच……………..

आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर करावं……….
आयुष्यात एकदा तरी प्रेम जरुर कराव……….

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला, म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला, मी वेड्यासारखी प्…

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला, म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला, मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले त

माझ प्रेम कधी कलाल नाही तुला,
म्हनुनच कायमचा सोडून गेलास मला,

मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले तुझ्यावर,
आणि तुही जिवापाड प्रेम केलास माझ्यावर,

पण का का कधी विचारल नाहीस मला,
माझ्या नकाराची भिती होती का तुला?

तुझ माझ प्रेम हे दोघांच्या मनात फुलत राहिल
दोघान्चाही एकमेकांवर प्रेम असुनही अपुर्णच राहिल,

आणि आता ते कायमच राहिल अपुर्णच
कारण तुझ्याशिवाय मी पण अपुर्णच

दूरावा म्हणजे प्रेम… अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम… दूराव्यात असते आठवण… अन…

दूरावा म्हणजे प्रेम… अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम… दूराव्यात असते आठवण… अन, ऒलाव्यात असते ती सा

दूरावा म्हणजे प्रेम…
अन, ऒलावा म्हणजे देखील प्रेम…
दूराव्यात असते आठवण…
अन, ऒलाव्यात असते ती साठवण…

दूराव्यात अनेक भास असतात…
अन, ऒलाव्यात तेच भास खास असतात..
दूरावा असह्य असतॊ…
ऒलावा मात्र हवाहवासा असतॊ…

दूराव्यातही असावा ऒलावा…
पण, ऒलाव्यात असू नये कधीही दूरावा…
दूराव्यात प्रेमाचं घर असतं,
अन, ऒलाव्यात त्याला सजवायचं असतं…

दूरावा तूझ्यात अन माझ्यात असला म्हणून काय झालं?
ऒलाव्यालाही हेवा वाटेल असा आहे आपल्या मनाचा आरसा…

तू विसरून गेलास……….. तू प्रेमात पडला आणि माझ प्रेम बघायला विसरून गेला तु…

तू विसरून गेलास……….. तू प्रेमात पडला आणि माझ प्रेम बघायला विसरून गेला तुझी प्रत्येक बडबड ऐकतेय

तू विसरून गेलास………..
तू प्रेमात पडला आणि माझ प्रेम
बघायला विसरून गेला
तुझी प्रत्येक बडबड ऐकतेय पण मला
जे ऐकायचय ते सांगायला विसरून गेला
मी हो म्हणील कि नाही याचा
तू स्वतःच विचार करून गेलास
फुलणाऱ्या माझ्या प्रेमावर
अशुभ विचार तू करून गेलास
नुसतच बघितलं डोळ्यांमध्ये
प्रेम बघायचं विसरून गेलास
सागायचं बरच काही होत तुला
सागायचं तू विसरून गेलास
विचारणार मी हि होते
पण अडवायचं तू विसरून गेलास