तो रस्ता मला पाहून आज हसला

All Posts

तो रस्ता मला पाहून आज हसला तो रस्ता मला पाहून आज हसला म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला हो ती हवा आजही तिथेच होती नेहमी तुझे केस विसकटणारी तो गाडयाचां गलकाही तिथे होता रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा त्या वळणाने मला आवाज दिला खरा पण आज मी मागे वळून पाहीलच नाही रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी आज एक युदध हरल्या सारख वाटत होत आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच रोज दोघं असतात पण आज हा एकच उत्तर होत जरी एकटाच असलो तरी तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज असतेच ना सागराच्या भरती आहोटीला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *