विसरत चाललोय

All Posts

विसरत चाललोय सारे धुसर ज़ाल्यात आठवणी! विसरत चललोय तुज़ा चेहरा, तुज़े हसणे,तुज़े बोलणे, आणि मनात घर केलेली तुज़्या गालावरची अवखळ खळी! विसरत चाललोय् तो पहिला पाउस ओलेती तु, आणि माज़्या डोळ्यातले भाव् पाहुन तुला फुटलेले हसू! विसरत चललोय तुज़े कळेभोर डोळे, त्यातील अल्लड भाव आणि ते पाहुन भरकटलेली माज़्या मनाची नाव!

माझ्या

All Posts

माझ्या हसण्यावर जाऊ नका हा तर एक मुखवटा आहे माझ्या चेह्ऱ्याव्रर फ़ुलणारे रंग कधी वाहून गेल्या आसवांची छटा आहे !! माझ्या बोलण्यावर जाऊ नका आहे शब्दांचा खेळ सारा शब्द शब्द जणू तुटलेला नुकताच ओठांतून निसटलेला !! माझ्या दिसण्यावर जाऊ नका आहे रोम रोम भांबावलेला आपल्याच माणसांच्या गर्दीत अनोळख्यासारखा भरकटलेला !! माझ्या लिहीण्यावर कधी जाऊ नका शब्दांच्या पलीकडले तरी शब्दांत बांधलेले शब्दाला शब्द जोडलेले अन‌ शाईत सारे ओवलेले !!

तुझ्या मिठीत मला यायचे आहे,

All Posts

तुझ्या मिठीत मला यायचे आहे,
अन् या जगाला विसरायचे आहे!

जरी तू माझ्यापासून दूर देशी,
तरी सागरकिनारा माझ्यापाशी!

कारण जेव्हा उभी असते मी सागरकिनारी,
दिसते मला आकाश अन् सागराची ती मिठी!

मग सांग सख्या रे! कधी तू येशी?
अन् अलगद तुझ्या मिठीत मला घेशी?

त्या क्षण्नाचा मोह न आवरे मला,
कारण तू येण्याची चाहुल सतावते आता मला!

त्या चाहुलितुन बघते मी रात्री आकाशी,
अन् भावनांवर माझ्या हसतो चन्द्र आकाशी!

मीही त्याला चिडवायच म्हणते,
पण हि सकाळ मला अडवते!

दाखवेन मीहि आपली मिठी त्याला एक दिवशी,
अन् तोही मग वर्षाव करेल त्याचा प्रितीचा आपल्यावरती!

आज निसर्ग सगला तुझ्यासोबती,
पण तू आहेस माझ्यासंगती!

जरी तू आहेस त्यांच्यासोबती,
तरी मन तुझे आहे माझ्यासंगती!

मग सांग कस त्यांना समजावू,
कारण आपल्या प्रेमात मला विश्वास आहे फ़क्त आपल्यावारती…
कारण आपल्या प्रेमात मला विश्वास आहे फ़क्त आपल्यावारती…

मैत्री कशी असावी?

All Posts

मैत्री कशी असावी? मैत्री कशी असावी? जी कधीही पुसली न जावी जशी रेघ काल्या दगडावरची कोणतही वातावरण पेलवनारी एखाद्या लवचिक वेलीसारखी…… कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी कुठेही चमकणार्‍या हिर्‍यासारखी थोड्याश्यावर न भागणारी दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी……. पवित्रतेने परिपूर्ण अशी देववरचि फ़ुले जशि….. कधीही न सम्पणारी विशाल सागरासारखी सतत बरोबर असावी शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी…. तुटली तरि कायम आठवणीत असणार्‍या आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी……….. मैत्री अशी असावी प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी मनाला तजेला देणारी कधीही न मरणारी अमर झालेल्या जिवासारखी

मैत्री म्हणजे

All Posts

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग. . .

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही

All Posts

म्हणुन मी हल्ली बोलतच नाही…..

मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात, भेटायच्या जागा चाट-रूम असतात, कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही, दिलखुलास शिवी कानी पडतच नाही, म्हणुन मी हल्ली बोलतच नाही दिसले कि हाय, जाताना बाय पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय, अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही, मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही म्हणुन मी हल्ली बोलतच नाही आज इथे उद्या तिथे……… कोणासाठी कोणी थांबणार नाही कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही, पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही, जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही, म्हणुन मी हल्ली बोलतच नाही शब्दच हल्ली अर्थ विसरतात, संवेदनाच हल्ली बधीर होतात, भावनाच हल्ली बोथट होतात, अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात