मेंदीच्या पानावर

All Posts

मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गं जाईच्या पाकळया दवं अजून सलते गं झूळझूळतो अंगणात तोच गार वारा हुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा अजून तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गं अजून तुझ्या डोळयातील मोठेपण कवळे गं

मैत्री म्हणजे

All Posts

मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दिलेला शब्द मैत्री म्हणजे आन मैत्री म्हणजे घातलेली शपथ मैत्री म्हणजे प्राण मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण मैत्री म्हणजे आयुश्यातील न सम्पणारी साठवण मैत्री म्हणजे मस्करी मैत्री म्हण्जे राग तरीही आपल्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग. . .

मैत्री म्हणजे

All Posts

मैत्री म्हणजे विश्वास मैत्री म्हणजे अभिमान मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान

 

मैत्री म्हणजे प्रेम मैत्री म्हणजे जाणीव मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव मैत्री म्हणजे विश्व मैत्री म्हणजे आकाश मैत्री म्हणजे तिमिरात वाट दावणारा प्रकाश मैत्री म्हणजे सुख दु:ख मैत्री म्हणजे हर्श मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा हळुवार स्पर्श मैत्री म्हणजे रान मैत्री म्हणजे कोवळे उन मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वार्याची धुन मैत्री म्हणजे खेड मैत्री म्हणजे पायवाट मैत्री म्हणजे पिकाला पाणी पाजणारा मळ्यातील पाट मैत्री म्हणजे तेज मैत्री म्हणजे तारा मैत्री म्हणजे प्रत्येकाला हवा असणारा मोहक वारा मैत्री म्हणजे दिलेला शब्द मैत्री म्हणजे आन मैत्री म्हणजे घातलेली शपथ मैत्री म्हणजे प्राण मैत्री म्हणजे ओढ मैत्री म्हणजे आठवण मैत्री म्हणजे आयुश्यातील न सम्पणारी साठवण मैत्री म्हणजे मस्करी मैत्री म्हण्जे राग तरीही आपल्या जीवनातील हा एक अविभाज्य भाग. . .

वारा गाई गाणे

All Posts

वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे धुंद आज वेली, धुंद फुल पाने रंग हे नवे, गंध हे नवे स्वप्न लोचनी वाटते हवे हा निसर्ग भासे, विश्वरुप लेणे या निळया नभी, मेघ सावळे कल्पनेस मी पंख लाविले झेलते पिसावरी, हे सतेज सोने आज वेड हे कुणी लाविले ? अंतराळी का पडती पाऊले ? कशी सोडवू मी सुखाचे उखाणे ?

तु आहेस म्हणुन

All Posts

तु आहेस म्हणुन आयुष्य खुप छान आहे, तुझ्यामुळेच तर मला,मी माणुस असल्याचं भान आहे.    तशी माझी किंम्मत शुन्यचं    होतो मी ही जाणुन.    आता मलाही अर्थ आहे    तु आहेस म्हणुन……. ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

तो रस्ता मला पाहून आज हसला

All Posts

तो रस्ता मला पाहून आज हसला तो रस्ता मला पाहून आज हसला म्हणाला प्रेमात बिचारा फ़सला हो ती हवा आजही तिथेच होती नेहमी तुझे केस विसकटणारी तो गाडयाचां गलकाही तिथे होता रोज तुझ्या माझ्या वादंवर हसणारा त्या वळणाने मला आवाज दिला खरा पण आज मी मागे वळून पाहीलच नाही रोज माझ्यावर हजार नजरा खिळत होत्या आज कोणी माझ्याकडे पाहीलच नाही आज किमंत कळाली तुझ्या सोबतीची मला आज सारखं चुकल्या सारखं वाटत होत पावले चालत होती पण वाट संपेनाच माझी आज एक युदध हरल्या सारख वाटत होत आज सगळ्याच्या मनात प्रश्न होता एकच रोज दोघं असतात पण आज हा एकच उत्तर होत जरी एकटाच असलो तरी तुझ्या आठवणी आहेत माझ्या सोबतीला पण खरचं कुठेतरी चद्रांचीही गरज असतेच ना सागराच्या भरती आहोटीला…

तू समजुन का घेत नाही……….

All Posts

तू समजुन का घेत नाही………. कसं गं तुला काही समजत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही ! इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस, भावना का माझ्या तुला जाणवत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला करमत नाही ! तू दुर असलीस की जगही खायला उठतं, कशातच लक्ष माझं लागत नाही ! एवढही तुला कसं कळत नाही, तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही ! कधी कधी असं वाटतं, तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही ! माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस, पण मुद्दामच तू मला भेटत नाही !! न भेटण्याने आता काही होणार नाही, मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही ! आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा, त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !! तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे, हा काही आज उद्याचा खेळ नाही ! तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू, असं स्वप्नातही शक्य होणार नाही !! किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तू हे समजुन का घेत नाही !!