मैत्री केली आहेस म्हणुन

मैत्री केली आहेस म्हणुन
तुला सांगावस वाटतय…
गरज म्हणून ‘नातं ‘ कधी जोडू
नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल
ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात
हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं
नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत
असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू
नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू
नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं
देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा..
पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते…फक्त
जरा समजून घे
‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही,
मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं
काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक ‘नातं ‘ जप , मध्येच
माघार घेऊ नकोस…!

हसता हसता डोळे अलगद येतील हि भरून

हसता हसता डोळे अलगद
येतील हि भरून
बोलता बोलता शब्द
ओठी जातीलही विरून
कावरबावर
होण्यासारखा बिलकुल
काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय ,
बाकी काही नाही……
रस्त्यामध्ये दिसतातच
कि चेहरे येत जाता
एका सारखेच दिसू
लागतील सहज
बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच
माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच
जीव …आणखी कोणी नसेल
भिरभिरल्यागत
होण्यासारखे बिलकुल
काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय ,
बाकी काही नाही……
मोबाईल वाजण्याआधीच
तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढून एसएमएस
वाचावासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल
उगाचाच उदास
पावलोपावली जड होत
जाईल बहुधा श्वास
घाबरूनबिबरुन
जाण्यासारखे बिलकुल
काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय ,
बाकी काही नाही……
जेवता जेवता जीवघेणा ला
गेलही ठसका
घरचे म्हणतील
सारखा कसा लागतो उठत
ा बसता
चेहरा लपवत , डोळे पुसत ,
पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला ,
सांभाळावे थोडे
सांगून द्याव
काळजीसारख बिलकुल
काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय ,
बाकी काही नाही……

सुदर मुलगी

कितिहि सुदर
मुलगी दिसली तरी,
तीचि स्तुति करुन तिला
हरबरयाच्या झाडावर
चढ्वायला
आम्हाला कधि जमलेच
नाहि ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम…
कोणाच्या मागे
शिट्ट्यामारत फिरन
आमच्या तत्वात
कधि बसलेच नाहि ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कोणिजर आवड्लिच तर
स्वतः हुन
गप्पांना सुरवात
करायला
आम्हाला कधि जमलेच
नाहि ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
दुसरयाचे विचार ऎकत
असतांना
आपले विचार
मांडण्याचि संधि
आम्हाला कधि साधताच
आलि नाहि ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
कधि हिंमत करुन
कोणाला जर विचारलेच
तर
मी तुला त्या द्रुषटिनि क
धि बघितलेच नाहि
यावेतिरिक्त दुसरे काहि
आम्हाला ऎकायलाच
मिळाले नाहि ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम…
प्रेमात नाहिचा अर्थ
हो असतो
हे गणित आम्हाल
कधि समजलेच नाहि ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..
फुलपाखरा प्रमाणे
आम्हि हि
बरयाच सुदर फुलां मधे
वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे
फुल
अजुन आम्हाला दिसलेच

एक वेडी मैत्रीण होती माझी…………….

एक वेडी मैत्रीण
होती माझी…………….
एक वेडी मैत्रीण
होती माझी ,
बोलायला लागली कि आप
लंसं करून टाकणार ,
तिचं मन म्हणजे नितळ
पाण्याचा झरा ,
स्वतःचा असा रंगच
नाही त्याला ,
जो रंग मिसळला त्याच
रंगात न्हाऊन निघणारं ,
नकळतपणे त्याच्याशीच
एकरूप होणारं ,
तिला एक दिवस
विचारलं,
यातले चांगले मित्र कोण
कसं ग तुला ओळखता येतं,
तर म्हणे ,
हे रंग तर प्रवाहाबरोबर
वाहून जातात ,
त्यांना माझ्यापासून
वेगळं करता येतं ,
खरे मित्र तर ते आहेत, जे
माझ्याच सारखे असतात ,
माझ्यात एवढं मिसळून
जातात कि ,
त्यांना माझ्याहून वेगळं

कळलेच नाही.

कळलेच नाही.
मोहात
तुझ्या मी कसा फसलो कळले
च नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच
नाही!
आयुष्य होते वाळवंट,
काटेकुटे सोबती माझे,
रानात काटेरी,फुले
फुलली कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच
नाही!
नको ती मनाची बेचॆनी,
अन हुरहुर जीवघेणी,
विश्वात माझ्या,तू
गुंतली कधी कळलेच नाही,
मी तुझा कधी झालो कळलेच
नाही!
वाटत होतं जगणं बिकट,
व्यर्थ भासत
होती स्वप्ने,
स्वप्नांच्या दुनियेत,सत्त्
य उतरले कळलेच नाही,
मी तुझ..

आता आली का ग तुला अक्कल…..

आता आली का ग तुला अक्कल….. चार वर्ष तुझ्या मागे फिरलो.. आणि अंग अंग जीरलो.. परीक्षा बुडवून..पुस्तक सोडल.. नाही त्याला तुझ्यासाठी फोडलं.. तुला बघण्यासाठीच .. झोपितून उठलो.. अन तुझ स्वप्न पडावं म्हणूनच झोपलो.. तुझ्या साठीच मी मित्रांशी लढलो.. तुझ्या साठीच मी सुळावर चढलो.. दारू सोडली..सिगारेट.. सोडली.. अक्खी बोतल डोस्क्यात फोडली… फोन केला तेंव्हा उचलली नाही स.. उचलला तर बोलली नाहीस.. का तर मला नाटके करता येत नव्हती.. खोटी स्तुती करता येत नव्हती,.. माझ वागणे दिखाऊ नव्हते… म्हणूनच का… मग आता कशी आली तुला अक्कल … का जुना प्रियकर सोडून गेला… का कुणी तुला धोका दिला .. का आता फोन करतेस…? संग का आता फोन करते…? आता आली का अक्कल तुला…. हे बघ..

ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक सुंदर मुली असतात,
पण जी गोड लाजते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे मुली जीन्स घालुन येतात,
पण जि जीन्स बरोबर पायात पैजण घालते,
ती मुलगी मराठी असते.

कॉलेजमधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते
ती मुलगी मराठी असते

कॉलेजमधे अनेक मुली असतात
स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते
ती मुलगी मराठी असते

शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते
ती मुलगी मराठी असते

प्रेम सगळे करतात
पण आयुष्यभर जी कुठ्ल्याही परीस्थीमध्ये
जी प्रेमाने साथ् देते
ती मुलगी मराठी असते

वर्‍हाडी ठसका क्र.(३)

वर्‍हाडी ठसका क्र.(३)
व्हॅलेन्टाईन्स डे चा येऊन गेला दिवस |
पोरा पोरियनं धरले होते प्रेमाचे नवस ||
गावभर हिंडून फुल देत फिरावं |
जो फसन जाळ्यात त्याले नाही सोडावं ||
काय आहे नियम खरचं का कयते |
आय लव्ह यु म्हणाले बापाचं काय जाते ||
सेम टू यु म्हणून झंडी दाखवावं हिरवी |
लफडेबाज पुस्तके वाचून घ्यावं सारी ||
मंग कानी प्रेमाचा सुरु होतो खेल |
दुपारी सिनेमा, संध्याकाळी भेल ||
आतंकवाद्यावानी बांधून तोंडाले |
मोकये यायले रानं गाडीवर मंग फिराले ||
लाज,शरमिले पार मंग सुट्टी |
शाळा,कॉलेजचे रोजच मंग गट्टी ||
फेशनचा जमाना रापचिक कपडे |
एकानं दहासंग खुशाल करावं लफडे ||
नवीन पिढीचं दिमाग लागले फिराले |
हृदयाले करून जमीन,प्रेम लागले पेराले ||
प्रेमाच्या नावावर नुसते मजे |
गरम तेल एकाचं दुसर्‍यान् तयाव भाजे ||
सरता वर्षे अजून धरावं नवसं |
व्हॅलेन्टाईन्स डे चा केव्हा येनं दिवस ||

वर्‍हाडी ठसका क्र.(४)

वर्‍हाडी ठसका क्र.(४)
प्रेमाचा ठसका
पाय कसे कसे हाल व्हते प्रेमात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || धृ ||
कुठ गेले कस्मे-वादे कुठ गेलं सपन
प्रेमाच शिखर जमिनीत झाल दफन
मंग कानी एकटाच जाऊन बसत खोर्‍यात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || १ ||
बोलून सर गोड गोड आपसात केला घात
प्रेमाच्या कुबड्यावर वज्जर मारली लात
नाही उरला फरक धोबीचा कुत्रा न् तुयात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || २ ||
चार दिवस प्रेमात मौजमजा केली
प्रेमाच्या नावावर तिनं तुई चांगली शेकली
बयाड झाल्यावानी ह्या फिरते मंग जंगलात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || ३ ||
रोज लपून भेटणं आता जाय भुलून
तिन देल्या वस्तू त्या दे फेकून
सोन्याची अंगठी तिची निघाली टपरी भावात
तिची जाते वरात ह्या लडते घरात || ४ ||